जादा परताव्याचे अमिष दाखवून 37 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी :ॲक्सिस सिक्युरिटीज ग्रुप मध्ये गुंतवणूक केल्यास प्रत्येक आठवड्याला 30 टक्के ज्यादा परतावा देण्याचे अमिष दाखवून 37 लाख 25 हजार 741 रुपयांची फसवणूक करण्यात आली .ही घटना 13 जानेवारी ते 20 मार्च 2026 या कालावधीत घडली.

याबाबत एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. व्हाट्सअप ग्रुप धारक, एडमिन ग्रुप, लिंक धारक, बँक अकाउंट धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना इंस्टाग्रामवर ॲक्सिस सेक्युरिटीज या नावाने जाहिरात दिसली. त्या जाहिरातीवर फिर्यादी यांनी क्लिक केल्यावर एल एक्सिस सिक्युरिटीज ग्रुपमध्ये फिर्यादी ऍड झाला. त्यामध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यास प्रत्येक आठवड्याला 30 टक्के एवढा जादा परतावा देण्याचे आश्वासन दिले .त्यानंतर व्हाट्सअप वरून फिर्यादीला व्हिडिओ कॉल आला. समोरून महिला बोलत होती. या महिलेने गुंतवणूक करण्यास सांगून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आणि बँक अकाउंट पाठवून कस्टमर केअरचा मोबाईल नंबर देऊन त्या नंबर वरून बँक अकाउंट नंबर पाठवून 37 लाख 25 हजार 741 एवढी रक्कम वेबसाईटवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
गुंतवणूक केलेली रक्कम व त्याचा परतावा असे मिळून सदर वेबसाईटवर एकूण एक कोटी 81 लाख 51 हजार 997 एवढी रक्कम दाखवून ती विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कमिशन फी भरल्याशिवाय ही रक्कम काढता येणार नाही असे सांगण्यात आले. 9 लाख 51 हजार 116 एवढी कमिशन फी भरल्यानंतर पुन्हा विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला असता 4 लाख 75 हजार 558 रुपये एवढा टॅक्स भरल्यानंतर विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला केला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दे दिली. त्यानंतर एफ आय आर दाखल करेल असे सांगितल्यावर फिर्यादीला व्हाट्सअप ग्रुप मधून काढून टाकून फिर्यादीचा विश्वासघात केला. याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेकर हे तपास करत आहेत.

