ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून 21 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग भाग पाडून एका व्यक्तीची 21 लाख 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 23 जून ते 9 जुलै 2025 या कालावधीत फ्लॅट नंबर 306, कोहिनूर बेगोनिया, बी-1 बिल्डिंग, वराळे ता. मावळ येथे घडली.

याप्रकरणी संतोष दिलीप पांडकर वय 45, रा फ्लॅट नंबर 306, कोहिनूर बेगोनिया, बी एक बिल्डिंग, वराळे,ता.मावळ यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृतिका ठाकूर, प्रेमजी न्यूज कमिटी, राजीव एनानी, विविध बँकांचे अकाउंट धारक यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा व्हाट्सअप मोबाईल धारकांनी गुंतवणुकीसाठी विश्वास संपादन करून जादा परताव्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी कडून 23 जून ते नऊ जुलै 2025 या कालावधीत विविध बँक खात्यावर 21 लाख 35 हजार रुपये आरोपींनी स्वीकारले. ते परत न करता आर्थिक फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.

