फक्त मुद्द्याचं!

30th June 2025
गुन्हेगारी

रिंगरोडचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक!

रिंगरोडचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक!

पिंपरी : मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत एका ठेकेदाराकडून १३ लाख रुपये उकळून फसवणूक केली. ही घटना बाणेर येथे घडली. पठाण खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील
घोटावडे येथील एका ठेकेदाराने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १० मार्च ते ११ मे दरम्यान बाणेर येथे घडली. आरोपी खान याने मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून रिंगरोडचे काम मिळवून देतो, असे आमिष दाखवले. फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण १३ लाख रुपये घेत फसवणूक केली. महिला फौजदार जाधव तपास करीत आहेत.

viarasmall
viarasmall

बीआरटी मार्गात कारच्या धडकेत पादचारी महिला जखमी
पिंपरी : भरधाव कारने धडक दिल्यामुळे पादचारी महिला जखमी झाली. ही घटना औंध – रावेत बीआरटी मार्गावर रावेत येथे मंगळवारी (दि. १७) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला अस्मिता संजय कांबळे (वय ३८, रा. कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अपघातात जखमी झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. त्यांचे पती संजय कांबळे (वय ४७) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भरधाव आलेल्या पांढर्‍या रंगाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अस्मिता या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर कार चालकाने अस्मिता यांना कोणतीही वैद्यकिय मदत न देता पळून गेला. पोलीस हवालदार मालुसरे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"