फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

नोकरी देण्याचे आमीष दाखवून दहा लाख 44 हजार रुपयांची फसवणूक!

नोकरी देण्याचे आमीष दाखवून दहा लाख 44 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी: सिंगापूर येथे 27000सिंगापूर डॉलर मासिक पगाराची नोकरी देण्याचे आमीष दाखवून एका व्यक्तीची 10 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 अगस्त ते 31 ऑक्टोबर या कालावधीत आकुर्डी येथे घडली.

गोकुळ हिम्मतराव गाजरे (वय 47) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार कुमार, संजय बोरसे, अनिल आदिवासी आणि आठ बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ऑनलाइन माध्यमातून नोकरी शोधत होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्याशी संपर्क केला. फिर्यादी यांना दरमहा 27 हजार सिंगापूर डॉलर पगाराची नोकरी देण्याचे आमीष दाखवले. नंतर त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली. फिर्यादी यांनी दहा लाख 44 हजार 650 रुपये आरोपींना वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठवून दिले. पैसे घेऊन देखील त्यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक करण्यात आली .निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"