फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

आई-वडिलांना जीवे मारण्याचा धाक दाखवून साडेनऊ लाख रुपयांची फसवणुक!

आई-वडिलांना जीवे मारण्याचा धाक दाखवून साडेनऊ लाख रुपयांची फसवणुक!

पिंपरी : धारदार कटरचा धाक दाखवून तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोन व्यक्तींनी सुमारे साडेनऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद तिघी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ही घटना 19 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर 2025 या दरम्यान बंसल सिटी सोसायटी दिघी रोड भोसरी येथे घडली. याबाबत रविवार पंचवीस जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

एका 52 वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आशु शैलेश खंडारे (वय 19, रा. बिल्डिंग ए, बंसल सिटी, दिघी रोड, भोसरी), ओमकार आवारे (रा. संत तुकाराम नगर, मौर्या कॉलनी रोड, भोसरी) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी यांचा मुलगा अन्वय राजेंद्र शिवशरण याला आरोपी क्रमांक एक व दोन यांनी संगणमत करून मुलाला घड्याळ देतो, केक देतो असे आमीष दाखवून विश्वास संपादन केला .आरोपी क्रमांक दोन यांच्या बँक खात्यात फिर्यादीच्या मुलाला धमकी देऊन पैसे पाठवण्यास सांगितले. आरोपी क्रमांक दोन यांच्या आईच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगून सहा लाख 61 हजार रुपयांची फसवणूक केली. तसेच फिर्यादी यांचे सासरे यांच्या बँक खात्यातून 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान दोन लाख 80 हजार रुपये आरोपी क्रमांक दोनच्या खात्यात जमा करण्यास लावले.याशिवाय 45 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. वेळोवेळी फिर्यादीच्या मुलाला धारदार कटरचा धाक दाखवून आणि तुझ्या सकट आई-वडिलांना जिवे मारण्याची भीती घालून ही फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कामुनी हे पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"