ऑनलाइनच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीकडून 80 हजाराची फसवणूक!

पिंपरी : ऑनलाइन पैसे पाठवण्याची अडचण सांगून तुम्हाला रोख रक्कम देतो असे सांगून फिर्यादीच्या मोबाईल वरून आपल्या खात्यात एका अनोळखी व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केली. ही घटना फिजा मोबाईल शॉप भारत पेट्रोल पंपाजवळ, देहूरोड- मोशी रोड येथे 11 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शहाबुद्दीन अलीमुद्दीन शह (वय 32, फ्लॅट नंबर 106, क्रिस्टल संगम सोसायटी, फाईन काटा, चिखली, मूळ रा. खोरिया रघुवीर सिंग, ता. डुगरीया गंज, जि. सिद्धांत नगर, उत्तर प्रदेश) यांनी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भोसरी एमआयडीसी येथे फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीच्या मोबाईल फिजा शॉप मध्ये सदर अनोळखी व्यक्ती अंगामध्ये मेहंदी रंगाचे शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेली अनोळखी इसमाने त्याच्या दुकानात येऊन मला ऑनलाईन पैसे पाठवायचे आहेत . ते तुम्ही पाठवा, मी तुम्हाला रोख पैसे देतो असे सांगून फिर्यादी यांना फोन पे चा स्कॅनर देऊन त्यावर एकूण 80 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना मी तुम्हाला एटीएम मधून पैसे काढून देतो तुम्ही मोटरसायकल घेऊन माझ्यासोबत चला असे म्हणाला. मला एटीएम माहित आहे. मी गाडी चालवतो तुम्ही मागे बसा असे आरोपी फिर्यादीला म्हणाला.
त्याप्रमाणे विश्वासाने फिर्यादी( युपी 55 / v 4034 या यामाहा कंपनीच्या दुचाकी वाहनावरून क्रांती चौकाजवळील आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एटीएम जवळ घेऊन गेला. तेथे फिर्यादीला दुचाकीवरून खाली उतरून त्यांची गाडी घेऊन आरोपी पळून गेला .अनोळखी आरोपीने 80 हजार रुपये ट्रान्सफर करून घेऊन व तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल घेऊन आर्थिक फसवणूक केली .याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणी संजय चव्हाण पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास करत आहेत.

