फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

साडेसहा कोटींची फसवणूक; कंपनीच्‍या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा!

साडेसहा कोटींची फसवणूक; कंपनीच्‍या दोन संचालकांविरुद्ध गुन्हा!

पिंपरी : भागीदारीचे आश्वासन देऊन मालमत्तेचे अधिकार व आयपी हक्कांचा गैरवापर करून साडेसहा कोटी रुपयांची फसवणूक केली. हा पक्रार देहू-मोशी रोड येथे घडला आहे.

अविनाश बेलगमवार, आकाश बेलगमवार (दोघेही रा. देहू-मोशी रोड, विठ्ठलनगर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. नित्यानंद करुपय्या थेवर (वय ४८, रा. सुखवानी प्रेसीडेन्सी, मोरवाडी, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. ४) याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

viarasmall
viarasmall

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ही घटना २००० ते २०१० या कालावधीत घडली. झेवीऑन मोबिलिटी इलेक्ट्रिक प्रा. लि. व ज्योती सोल्युशन वर्क्समध्ये मालमत्तेच्या हस्तांतरावरून फसवणूक झाली. रोपींनी भागीदारीचे बनावट आश्वासन देत महत्त्वाचे आयपी अधिकार व डाय खरेदी फिर्यादी यांच्‍याकडून घेत कंपनीच्या उत्पादनासाठी वापरत तब्‍बल साडेसहा कोटींची फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"