फक्त मुद्द्याचं!

8th September 2025
गुन्हेगारी

गुंतवणुकीच्या बहाण्याने 39 लाख 83 हजाराची फसवणूक!

गुंतवणुकीच्या बहाण्याने 39 लाख 83 हजाराची फसवणूक!

पिंपरी : एफएक्स रोड ट्रेडिंग या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल ,असे आमीष दाखवून दिघी येथील एका व्यक्तीची 39 लाख 83 हजार 730 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे .हा प्रकार 26 फेब्रुवारी ते दोन मे या कालावधीत दिघी येथे ऑनलाइन माध्यमातून घडला आहे .याप्रकरणी 63 वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार एफ एक्स रोड ट्रेडिंग हे ॲप्लिकेशन चालवणारे चालक ,टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन कॉल वर बोलणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व्यक्तीने एफ एक्स रोड ट्रेडिंग कंपनीचे एप्लीकेशन फेसबुक लिंक वरून डाऊनलोड केले होते .त्यानंतर त्यांना कंपनीच्या व्यवस्थापकांचा आणि इतर व्यक्तींचा फोन आला .फोनवरील व्यक्तींनी कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्याबाबत मार्गदर्शन केले .फिर्यादी याचे ट्रेडिंग अकाउंट सुरू करण्यात आले .तसेच वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास भाग पाडले.

Vaiga Digital Creatives
Vaiga Digital Creatives

पैसे गुंतवणूक केल्यानंतर ते पैसे वाढत असल्याचे त्या ॲप्लिकेशन मध्ये दाखवण्यात आले. काही कालावधीनंतर फिर्यादी यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पैसे काढून घेण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे भासविण्यात आले. त्यानंतर एका महिलेने फिर्यादीस फोन करून आणखी पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी एकूण 39 लाख 83 हजार 730 रुपये भरले .मात्र आरोपींनी त्यांना कोणताही मोबदला अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता, त्यांची फसवणूक केली .दिघी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"