अमिष दाखवून 23 लाखाची फसवणूक!

पिंपरी : पिंपरीतील एका हॉस्पिटलमध्ये मेडिकलचा चांगला व्यवसाय मिळवून देण्याचे आमीष दाखवून एका महिलेची 23 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 22 एप्रिल 2024 ते 11 मार्च 2020 या कालावधीत आयुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपरी आणि मोशी, अन्न व औषध प्रशासन कार्यालयात घडली.

याप्रकरणी एका महिला फिर्यादीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विलास वसंत डांगे, (रा. रहाटणी), एक महिला आरोपी आणि नोटरी करणारे वकील गोविंद पाटील (रा. काळेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विलास डांगे याने फिर्यादीला मेडिकलमध्ये मोठा परतावा मिळेल असे सांगून 23 लाख रुपये डिपॉझिट घेतले. मात्र व्यवसाय न झाल्याने फिर्यादीने पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या बनावट सह्या करून नोटरीद्वारे खोटा तडजोड करारनामा तयार केला. या बनावट कागदपत्राच्या आधारे फिर्यादीचे मेडिकल लायसन्स रद्द करून आरोपीने स्वतःच्या पत्नीच्या आणि फार्मासिस्टच्या नावाने परवाना मिळवून पुन्हा व्यवसाय सुरू केला. मेडिकलचा व्यवसाय देण्याचे

