फक्त मुद्द्याचं!

27th February 2026
गुन्हेगारी

कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या नावाने फसवणूक!

कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या नावाने फसवणूक!

पिंपरी :कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पाच लाख 45 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना सहा एप्रिल 2024 ते 23 फेब्रुवारी 2026 यादरम्यान ड्रीम्स करणीवल सोसायटी चर्होली आणि कर्नाटक येथे घडली.

बीरनारायण गोरखसिंग (वय 46, रा. ड्रीम्स करणीवल सोसायटी, चर्होली) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार शरणगौड रुद्रगौड बिरादार (देवरहिस्टरी, सिंदगी, विजापूर, कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्याच्या मुलीला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी त्याने फिर्यादी कडून आरटीजीएस, ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण पाच लाख 45 हजार रुपये घेतले. मात्र पैसे घेऊनही मुलीला प्रवेश मिळवून दिला नाही. फिर्यादीने जेव्हा आपले पैसे परत मागितले तेव्हा आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ करत त्यांना शिवीगाळ केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

घरगुती गॅसची अवैध रिफिलिंग;एका व्यक्तीला अटक!
पिंपरी : चाकण मधील खंडोबा माळ परिसरात घरगुती गॅस सिलेंडर मधून बेकायदा लहान टाक्यांमध्ये गॅस भरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी रात्री करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई भैरोबा यादव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजू रजपूत (वय 30, रा. चाकण) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजू याने खंडोबा माळ येथील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर साठवले होते. तेथून तो छोट्या टाक्यांमध्ये गॅस भरत असताना पोलिसांनी छापा टाकला. त्याच्याकडून 16000 रुपये किमतीचा गॅस जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"