डिजिटल अटकेच्या भीतीने फसवणूक !

पिंपरी :सायबर गुन्हेगारांनी एका सेवानिवृत्त व्यक्तीला व्हिडिओ कॉल द्वारे डिजिटल अटक आणि आर्थिक फसवणूक गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लाखोंची ऑनलाइन फसवणूक केली .ही घटना 23 जुलै ते 29 सप्टेंबर दरम्यान समाज माध्यमातील व्हाट्स अँप वरून ऑनलाईन पद्धतीने घडली. याप्रकरणी 71 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या समाज माध्यमातील व्हाट्सअप नंबर वर आरोपींनी व्हिडिओ कॉल केला. त्यावरून फिर्यादीला सांगितले की त्याच्या नावावरील मोबाईल नंबर चाइल्ड पॉर्नोग्राफीमध्ये वापरला गेला आहे .सायबर क्राईम विभागाने त्यांच्यावर मनी लॉन्ड्रीचा गुन्हा दाखल केला असून एका बँकेचे एटीएम कार्ड एका व्यक्तीच्या घरातून जप्त केले आहे. फिर्यादीने मनी लॉन्ड्री साठी खाते वापरण्यास देऊन 25 लाख रुपये कमिशन घेतले आहे असे आरोपींनी सांगितले .सीबीआय विभाग आणि कोर्टासमोर ऑनलाइन व्हाट्सअप व्हिडिओ कॉल वरून फिर्यादीला हजर करून त्यांना 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत डिजिटल अटक करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत असे सांगितले.
अनुक्रमे 15 लाख 50 हजार रुपये आणि सात लाख रुपये वळती करण्यास सांगितल्यावर फिर्यादीने ते पाठवले .यानंतर आरोपींनी पुन्हा व्हिडिओ कॉल करणे बंद केले .सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

