चार चाकी गाडीचे लोण, व्याजाचे हप्ते न भरता फसवणूक!

पिंपरी: टाटा कंपनीची नेक्सन चार चाकी गाडी लोणच्या व्याजासहित खरेदी करून गाडीचे लोन आरोपीच्या नावे ट्रान्सफर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चार चाकी गाडी आरोपी घेऊन गेले मात्र एकही पैसा न देता, गाडीचे हप्ते न भरता फसवणूक केली. ही घटना 24 नोव्हेंबर 2025 स्पाईन सिटी मॉल, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

याबाबत एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिल अशोक चौधरी (वय अंदाजे 32, रा. अशोक नगर, दौंड रस्ता, घारगाव, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या मालकीची टाटा कंपनीची नेस्कॉन चार चाकी गाडी लोणच्या व्याजासहित 18 लाख 48 हजार रुपये रकमेस खरेदी करताना फिर्यादी यांना एक लाख साठ हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले. कारचे उर्वरित लोन आरोपीच्या नावे ट्रान्सफर करण्याचे आश्वासन देण्यात आले. तशी नोटरी करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी विश्वासाने सोपविलेली गाडी घेऊन जाऊन त्यांची फसवणूक केली. आजपर्यंत एकही बँकेचा हप्ता न देता व ठरलेली रोख रक्कम न देता फसवणूक करण्यात आली .भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

