फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

घरगुती साहित्य इच्छित स्थळी न पोहोचवता फसवणूक!

घरगुती साहित्य इच्छित स्थळी न पोहोचवता फसवणूक!

पिंपरी : आपसाआपसात संगणमत करून एका व्यक्तीचे घरगुती सामान झारखंड येथे व्यवस्थित पोहोचवतो असे सांगून हे सामान झारखंड येथे न पोचवता 23 लाख 80 हजार रुपये किमतीचे घरगुती साहित्य व सामानाचा अपहार व फसवणूक केल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 नोव्हेंबर रात्री दहा वाजता ते 16 डिसेंबर 2025 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आय ट्रेड होम सोसायटी हिंजवडी येथे घडली .

viara vcc
viara vcc

याप्रकरणी अभिषेक कुमार सिताराम पाठक (वय 30 , रा. आय ट्रेड होम सोसायटी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इ आय इ मार्केट प्लेस टेक्नॉलॉजी कंपनीचे ऑपरेशन हेड मोहन कुमार व एमडी सोना त्रिवेदी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एक व दोन यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांचे घरगुती सामान हे झारखंड येथे व्यवस्थित पोहोचवतो असे सांगून विश्वास संपादन केला. हे सामान पोहोचविण्यासाठी एक लाख 28 हजार रुपये आरोपींनी फिर्यादीकडून घेतले. मात्र फिर्यादीचे घरगुती सामान व साहित्य त्यांचे मूळ गावी रा. दुलदुलावा ता. निराल ,जि. गढवा, झारखंड येथे न पोचविता 23 लाख 80 हजार रुपये किमतीचे घरगुती साहित्य व सामानाचा अपहार करून फसवणूक केली अशी फिर्याद दिली आहे . याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"