फक्त मुद्द्याचं!

14th March 2026
गुन्हेगारी

पोलीस महासंचालकांची ओळख असल्याचे सांगून फसवणूक!

पोलीस महासंचालकांची ओळख असल्याचे सांगून फसवणूक!

तळेगाव : पोलीस महासंचालकाकडे आमची ओळख असून तुमच्या मुलाला पोलीस मध्ये नोकरी लावतो असे सांगून तीन व्यक्तींनी सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना दोन जुलै 2024 ते 13 मार्च 2026 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी अशोक बापूराव बटगी (वय 58, रा. झवेरी कॉलनी, लीलावती ग्रीन सोसायटीच्या मागे, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जितेंद्र रामचंद्र पिंगळे (वय 40 ), महिला आरोपी, दिघू पिंगळे (नाव पत्ता माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी आमची पोलीस महासंचालक यांच्याकडे ओळख असल्याचे सांगून फिर्यादी यांचा मुलगा प्रसाद यास पोलीस विभागात नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादीचा मुलगा यांचे मोबाईल गुगल पे नंबर वरून आरोपी क्रमांक एक याने गुगल पे नंबर वर सहा लाख रुपये घेऊन फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली. तसेच फिर्यादी व फिर्यादीच्या मुलास धमकी दिली तुम्ही आमची कुठे तक्रार केली तर मी तुम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवून टाकीन .तुम्ही जास्त घाई केली तर तुम्हाला तुमचे पैसेही परत मिळणार नाहीत असे सुनावले.

तसेच आरोपी क्रमांक तीन याने फिर्यादीचा मुलगा प्रसाद याला कॉल करून तुम्ही पैसे मागितले तर मी तुझे वडिलांना कामावरून काढून टाकीन, तसेच यापुढे तुम्ही सोसायटीमध्येही दिसले नाही पाहिजे, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील हे अधिकचा तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"