चार मोटरसायकल चोरी , घरफोडीचा गुन्हा उघड!

पोलीस परिमंडळ 4 ची कारवाई
चाकण : महाळुंगे एमआयडीसी आणि परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चार मोटरसायकली, घरफोडी मधील सोन्याचे पदक असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 च्या श्वेता खेडकर यांनी दिली आहे .

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी परिसरात वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबतचा तपास करण्यास दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय20, सध्या रा. गणेश मंदिराजवळ चक्रपाणी वसाहत, भोसरी, मूळ- रा. महेंद्र नगर, नेपाळ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तांत्रिक तपास व उपलब्ध सीसीटीव्हीचे आधारे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने महाळुंगे एमआयडीसी व आसपासच्या परिसरातून चार मोटरसायकली चोरी केल्या असल्याचे कबूल केले. तसेच एक घरफोडी केल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी चोरी केलेल्या चार मोटरसायकली व घरफोडी मधील सोन्याचे दीड ग्रॅम सोन्याचे पदकासह एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. यामुळे पाच गुन्हे उघड झाले आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 च्या श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त महाळुंगे विभाग सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस आंमलदार देवराम पारधी, विश्वास नानेकर, किशोर सांगळे, युवराज बिराजदार, चेतन सावंत, राजेंद्र खेडकर, राजेश गिरी, महेश गायकवाड, राजकुमार हनुमंते, प्रशांत कसबे, शिवाजी मरकड, आकाश घाडगे या पथकानेकेली.

