गुंतवणुकीच्या नावाखाली चार कोटींची फसवणूक!

पिंपरी : बनावट ई-मेल आयडी तयार करून शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीतबाणेर येथे
घडली.
सूदर्शन श्रीकांत लाठकर (वय ३३, रा. नणावरे चौक, बाणेर) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिरूमलशेट्टी व्यंकटेश्वर राव उर्फ टी. व्ही. राव व तिरूमलाशेट्टी राघव (रा. आंध्रप्रदेश) यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून आयसीआयसीआय सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार केले. या ई-मेलवरून कंपनीची बनावट कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवून टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स फिर्यादी यांना विकल्याचे भासवले. त्यानंतर लाठकर यांच्याकडून आरोपीने वेळोवेळी त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात मार्जिन मनीच्या नावाखाली सुमारे ४ कोटी ९७ लाख रुपये घेतले. त्यापैकी ९९ लाखांचा परतावा करून उर्वरित सुमारे ३ कोटी ९८ लाख रुपये परत न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून त्यांची फसवणूक केली. फौजदार जाधव तपास करीत आहेत.

चिंचवडमध्ये महिलेला तिघांकडून मारहाण
पिंपरी : पतीला चुकीची माहिती सांगितल्याच्या रागातून एका महिलेस तिघांनी मिळून शिवीगाळ व मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. २१) दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड – केशवनगर येथे घडली.
मारहाण झालेल्या महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन महिलांसह विजय भगवान जाधव (तिघे रा. पागेची तालीम, केशवनगर, चिंचवडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. घरासमोर उभ्या असलेल्या पीडितेला विजय जाधव आणि दोन महिला आरोपींनी उद्देशून शिवीगाळ केली.यामध्ये एका महिले सोबतच्या आरोपीने पीडितेचे डोके धरून मारहाण केली. दुसर्या महिलेने हात पकडले आणि विजय जाधव याने दगडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. फौजदार दुधे तपास करीत आहेत.