फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

शासकीय रुग्णालयातच बनावट औषधांचा पुरवठा

शासकीय रुग्णालयातच बनावट औषधांचा पुरवठा

बीडमधील धक्कादायक प्रकार; चौघांना अटक

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बीड जिल्ह्यात शासकीय रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या चौघांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या वतीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात सविस्तर चौकशी केल्यानंतर ५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे येथील बीड जिल्ह्यातील मुख्य रुग्णालय आहे. जवळपासच्या जिल्ह्यातून उपचारांसाठी लोक येथे येत असतात.

महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठादारानेच बनावट औषधांचा पुरवठा केल्याचे उघड झाले आहे. सूरत आणि ठाणे येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट औषध निर्मिती आणि विक्री करण्यात आंतरराज्य टोळीची शक्यता वर्तविली जात आहे. औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सुरेश पाटील, मिहिर त्रिवेदी, द्विती त्रिवेदी आणि वीजय चौधरी या चौघांवर अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोणती होती बनावट औषधे
औषध विभागाच्या तपासणीमध्ये अॅझिमसीम ५०० ही अॅझिथ्रोमायसिनची औषधे बनावट निघाली आहेत. घसा, कान, फुफ्फुसांच्या संसर्गावर ही गोळी वापरली जाते. ई-टेंडरद्वारे कोल्हापूरच्या एजन्सीकडून ही औषधे पुरविण्यात आली होती.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"