फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
Uncategorized गुन्हेगारी

बेकायदेशीररित्या राहणारे जेरबंद

बेकायदेशीररित्या राहणारे जेरबंद

प्रतिनिधी, पिंपरी : बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहणार्‍या दोन महिलांसह चार बांगलादेशी नागरिकांना पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या दहशत विरोधी शाखेने जेरबंद केले आहे.

पूजा धन्नो सरकार उर्फ रुबाया बिलाल मासूम नूर इस्लाम शेख (वय २४), तिचा पती धन्नो अरुण सरकार (वय २६), दीर मन्नो अरुण सरकार (वय २४) आणि लाबोनी सुशील अय्यर उर्फ साथी खातून मंडल (वय २८) या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसेच, या आरोपीना बनावट कागदपत्रे बनवून देणार्‍या इतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. दहशत विरोधी पथकाचे पोलीस शिपाई तान्हाजी सोनवणे यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना नसताना वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय ते भारतात व्हिसाशिवाय राहत होते.भारत आणि बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्‍यांच्या लेखी परवानगी शिवाय ते घुसखोरीच्या मार्गाने गेल्या १२ वर्षापूर्वी भारतात आले होते.

गेल्या दोन वर्षापासून ते मोशी येथे वास्तव्यास आहेत. आरोपी धन्नो हा मोशी येथे रस्त्यावर फळविक्रीचा व्यवसाय करतो. तर, त्याचा भाऊ मन्नो हा एका कंपनीत कामाला आहे. त्यांनी बनावट आधारकार्ड, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला बनवून घेतला. त्याच आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवायचे. बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सिमकार्डही मिळवले होते. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा, पारपत्र अधिनियम या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक पठारे पुढील तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"