माजी पंतप्रधान मनमोहन सिंह अनंतात विलीन!

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह अनंतात विलीन झाले. शासकीय इतमामात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
मान्यवरांकडून श्रद्धांजली
अंत्यसंस्कारामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री निगमबोध घाटावर सहभागी झाले होते.
काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार,आज शनिवारी २८ डिसेंबरला सकाळी साडेनऊ वाजता दिल्लीस्थित एआयसीसी मुख्यालय येथून मनमोहन सिंग यांचे पार्थिव निगमबोध घाटाच्या दिशेने रवाना झाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्या कारणाने राष्ट्रपती भवनात शनिवारी होणारा चेंज ऑफ गार्ड सेरेमनी कार्यक्रस रद्द करण्यात आला. ही एक सैन्य परंपरा आहे. माजी पंतप्रधानांच्या सन्मनार्थ संपूर्ण देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान संपूर्ण देशात राष्ट्रध्वज झुकलेला राहील. काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर दिल्लीतील निगमबोध घाट येथे डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची कारकिर्द
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ला पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. त्यांनी १९४८मध्ये पंजाब विश्वविद्यालय येथून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षणक ब्रिटनच्या केंब्रिज विश्वविद्यालयातून घेतले. १९५७मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्रथम श्रेणीतून ऑनर्सची डिग्री मिळवली. यानंतर १९६२मध्ये त्यांनी ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीच्या नूफिल्ड कॉलेज येथून अर्थशास्रात डी.फिल केली. डॉ मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांच्या तीन मुली आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ला पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. त्यांनी १९४८मध्ये पंजाब विश्वविद्यालय येथून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षणक ब्रिटनच्या केंब्रिज विश्वविद्यालयातून घेतले. १९५७मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्रथम श्रेणीतून ऑनर्सची डिग्री मिळवली. यानंतर १९६२मध्ये त्यांनी ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीच्या नूफिल्ड कॉलेज येथून अर्थशास्रात डी.फिल केली.