फक्त मुद्द्याचं!

28th March 2026
देश विदेश

नेपाळमध्ये माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री लेखक यांना अटक!

नेपाळमध्ये माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री लेखक यांना अटक!

काठमांडू : नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर अवघ्या 24 तासात नवीन पंतप्रधान बालन शहा यांनी माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

viara vcc
viara vcc

गेल्या वर्षी झालेल्या तरुणांच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या हत्याप्रकरणी माजी पंतप्रधान के पी शर्मा ओली आणि माजी गृहमंत्री रमेश लेखक यांना आज ( शनिवार )पहाटे अटक करण्यात आली आहे. के पी शर्मा ओली यांना भक्तपुर येथील गुंडू भागातील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. तर रमेश लेखक यांना पहाटे पाचच्या सुमारास भक्त पुढच्या सूर्य विनायक येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि व्यवस्थेविरोधात तरुणांनी मोठे आंदोलन केले होते या आंदोलनादरम्यान निशास्त्र विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा आणि त्यात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांवर ठेवण्यात आला आहे .तपास आयोगाच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे .शुक्रवार 27 मार्च रोजी बालाजी शहा यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि 24 तासांच्या आतच जुन्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई करून आक्रमक धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे.

नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत बालेन शहा यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच बालन शहा यांनी ही कारवाई केली आहे,

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"