फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

माजी आमदार संग्राम थोपटे यांचा काँग्रेस पक्षाला राम राम!

माजी आमदार संग्राम थोपटे यांचा काँग्रेस पक्षाला राम राम!

पुणे : माजी आमदार जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाचा आज राजीनामा दिला असून मंगळवार 22 एप्रिल रोजी ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत .पुणे जिल्ह्यातील भोर मतदार संघात थोपटे यांचे प्राबल्य आहे. भोर मतदार संघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात असून थोपटे यांनी महाविकास आघाडीची सात सोडण्याचा निर्णय घेतल्याने आगामी बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप आपली ताकद वाढवण्यासाठी आज पर्यंत झटत आला आहे .आता त्यांना त्यात यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.

संग्राम थोपटे हे माजी आमदार असून विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मांडेकर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. 1972 ते 2024 या या 52 वर्षाच्या कालखंडात 45 वर्ष भोर मतदारसंघाची आमदारकी थोपटे यांच्या घरात असल्याचे दिसून येते. संग्राम थोपटे यांचे वडील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी 1972 मध्ये या मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि बाजी मारली .त्यानंतर 1978 ते 1980 या कालावधीत भोरचे प्रतिनिधित्व शरद पवार समर्थक संपतराव जेधे यांनी केले. त्यानंतर सलग 19 वर्ष थोपटे हे भोर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडली त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधून काशिनाथ खुटवड यांना उमेदवारी देऊन विजयी केले. 2004 मध्ये पुन्हा अनंतराव थोपटे विजयी झाले .2009 मध्ये अनंतराव थोपटे यांनी आपले चिरंजीव संग्राम थोपटे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी केले. यानंतर संग्राम थोपटे हे 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले.

viara ad
viara ad

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर संग्राम थोपटे हे विधानसभेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात खोडा . अशीच परिस्थिती माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे शरद पवारांच्या विरोधामुळे मुख्यमंत्रीपद देखील गले. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे .माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पक्षाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता माजी आमदार संग्राम थोपटे हे देखील 22 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत .महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"