माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा अर्थात सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.
कृष्णा यांनी २००७ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी राजकीय कामात फारसा सहभाग नोंदविला नाही. मात्र साठ वर्षांच्या एकूण कारकिर्दीत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, राज्यपाल अशी विविध पदे भूषविली आहेत. राजकीय वर्तुळात त्यांना श्रेष्ठ मानले जात असे. अमेरिकेतील लॉ स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. जुन्या मैसूरचा भाग असलेल्या मंड्या जिल्ह्यातील मद्दूर हे त्यांचे मूळ गाव.
राजकीय क्षेत्रातील सहा दशकाच्या त्यांच्या कामाची पावती म्हणून कृष्णा यांना २०२३ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्माविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. १९६० मध्ये कृष्णा यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा, दोन मुली शांभवी आणि मालविका आहे.