फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
विधानसभा २०२४

शंकर जगताप यांना भोंडवेंचा पाठींबा

शंकर जगताप यांना भोंडवेंचा पाठींबा

चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यासाठी मैदानात उतरले असून त्यांनी रावेत येथे निर्धार मेळावा घेत जगताप यांना जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जगताप यांचे पारडे जड झाले आहे.

मोरेश्वर भोंडवे यांनी रावेत येथे निर्धार मेळावा घेत हजारो रावेतवासीयांच्या साक्षीने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोरेश्वर भोंडवे आणि शंकर जगताप यांना एकत्रितपणे पुष्पहार घालून या नवीन युतीचे जोरदार स्वागत केले.

यावेळी बोलताना मोरेश्वर भोंडवे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मी देखील तयारी केली होती. मात्र तिकीट न मिळाल्याने मी या निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु माघार घेतली तरी चिंचवड विधानसभेच्या विकासाचा मुद्दा हा माझ्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता. आणि यासाठी मला सक्षम पर्याय म्हणून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हेच योग्य वाटले. त्यामुळे माझ्या सर्व सहकारी मित्रांशी यासंदर्भात चर्चा करून आणि रावेतमधील जनतेचा कौल घेऊन मी शंकर जगताप यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. आणि या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने या निवडणुकीत जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी कमळ या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन मी रावेतवासीयांना करतो, असे भोंडवे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी कुणाल भोंडवे, आप्पा रेणुसे, उमेश चांदगुडे, नामदेव ढाके, मनोज खानोलकर, चेतन भुजबळ, संतोष कलाटे, कुणाल लांडगे, दत्तामामा भोंडवे, विजय जगदाळे, तात्या आहेर, श्री. कोंडे, सौ. मरळ यांच्यासह रावेत परिसरातील हजारो ग्रामस्थ आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमचे सहकारी मित्र मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भोंडवे यांच्याकडेही विकासाची दूरदृष्टी आहे. रावेत गावच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी दिलेल्या जाहीर पाठींब्यामुळे निश्चितच आमची ताकद द्विगुणीत झाली असून आमच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास दुणावला आहे. आगामी काळात आम्ही खांद्याला खांदा लावून चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असून त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य कायम आमच्यासोबत असेल. तसेच रावेतच्या जनतेनेही जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला आहे त्या विश्वासाला नक्कीच पात्र होण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन अशी ग्वाही शंकर जगताप (महायुतीचे उमेदवार) यांनी दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"