भीमा कोरेगाव येथे जाण्याकरिता अनुयायांनी खालील मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन!

पिंपरी : भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांनी खालील मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागाने केले आहे .

1. मुंबई, नवी मुंबई, ठाणे बाजूकडून बसेसद्वारे येणाऱ्या अनुयायांनी तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गे जावे
2. मुंबई, नवी मुंबई, ठाणे बाजूकडून येणाऱ्या छोट्या चार चाकी वाहनांनी वडगाव फाटा, सेंट्रल चौक, भक्ती शक्ती, नाशिक फाटा, खडकी व दापोडी तसेच बोपखेल मार्गे पुणे शहरात प्रवेश करून येरवडा, वाघोली, लोणीकंद मार्गे जावे.
3. नाशिककडून येणाऱ्या अनुयायींनी खेड – पाबळ- शिक्रापूर मार्गे जावे.
4. आळंदी येथील चऱ्होली बुद्रुक ते चरोली खुर्द यांना जोडणारा पूल सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतूकीस बंद केला असल्याने आळंदी येथील प्रदक्षिणा मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे त्यामुळे आळंदी, मरकळ, तुळापूर, लोणीकंद मार्गे भीमा कोरेगाव जाणारे मार्गाचा अनुयायी तसेच सर्व प्रकारच्या खाजगी वाहनांनी वापर करू नये.
5. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अनुयायांनी नाशिक हायवे वरील भारत माता चौक, मोशी फाटा, आळंदी फाटा, चिंबळी फाटा, आळंदी या मार्गाचा अवलंब न करता नाशिक फाटा, हॅरीस ब्रिज, खडकी, येरवडा, लोणीकंद मार्गे भीमा कोरेगावला जावे

