फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक!

पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक!

 पिंपरी : निगडी ओटा स्कीम स्पाईन रोडवरील डिव्हायडर मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पैशावर पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवार 24 डिसेंबर रोजी दुपारी चिकन चौकाजवळ निगडी येथे घडली. याप्रकरणी राहुल गायकवाड पोलीस शिपाई यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी तुकाराम केरबा कांबळे (वय 41, रा राजनगर, निगडी ),सलीम रहिम शेख (वय 60 ,राजनगर, निगडी), मारुती धोंडीबा पवार (वय 69, स्पाईन रोड, निगडी), खाजा मिया वल्ली अहमद शेख (वय 70, रा. इंदिरानगर, निगडी), सदाशिव यल्लाप्पा कांबळे (वय 69, इंदिरानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे पाचही आरोपी सार्वजनिक ठिकाणी पैशाने पत्त्याचा जुगार खेळत असताना पोलिसांच्या पथकाला मिळून आले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

झाड तोडण्याच्या वादावरून मारहाण!
पिंपरी :शेतातील झाडावर ट्रॅक्टर घातलेच्या आणि झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून दोन व्यक्तींना मारहाण केली. ही घटना बुधवार 24 डिसेंबर रोजी सकाळी सेल पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी सुधीर खंडेराव ठाकूर (वय 42, सेल पिंपळगाव, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी सागर तुकाराम दौंडकर, प्रशांत विलास दौंडकर, विलास वामन दौंडकर आणि तुकाराम वामन दौंडकर (सर्व रा सेल पिंपळगाव ,खेड )यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीच्या घरामागे ट्रॅक्टर घातला आणि झाडे तोडू लागले. फिर्यादीच्या चुलत भावाने त्यांना झाडे का तोडता असे विचारले असता आरोपींनी त्यांना दगड, काठी आणि हाताने मारहाण केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"