गुंतवणुकीच्या आमिषाने पाच कोटीची फसवणूक!

पिंपरी : गुंतवणुकीवर ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल चार कोटी 97 लाख 45 हजार 217 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 12 जानेवारी 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत हिंजवडी येथील साखरे वस्ती रोड परिसर येथे घडली.

याबाबत साखरे वस्ती रोड हिंजवडी तालुका मुळशी येथील एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी सनी शहा (कोलकत्ता पूर्ण पत्ता माहित नाही), राहुल जैन (इंदोर मध्य प्रदेश पूर्ण पत्ता माहित नाही), आमिर खान व मयूर शेख (पूर्ण पत्ता माहीत नाही), कॅनरा बँकेतील खातेदार आणि सिटी युनियन बँकेच्या अज्ञात खातेदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित फिर्यादीला 12 जानेवारी 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत माफीनिक्स इन्फोनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा सहा टक्के परतावा मिळेल असे सांगून फिर्यादी कडून विविध बँक खात्या द्वारे एकूण चार कोटी 97 लाख 45 हजार 217 रुपयांची रक्कम उकळली. ठरलेला परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले . सायबर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे याबाबत अधिक तपास करीत आहेत. गुंतवणुकीच्या आमिषाने पाच कोटीची फसवणूक

