मोबाईल हॅक करून बॅंक खात्यातील साडेपाच लाख लांबविले!

पिंपरी : मोबाईल हॅक करून स्टेट बँक ऑफ इंडियामधील खात्यातील ट्रांजेक्शन आयडी नुसार पाच लाख पन्नास हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. ही घटना 23 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने फिर्यादीच्या राहते घरी केली.

याबाबत अभिजीत किसनराव कृष्णाजी वय 29, झिंजुर्डे मळा जवळ, क्रिस्टल लॉन्स, सुजित झिंजुर्डे यांचे भाडेचे खोलीत, पिंपळे सौदागर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पाच लाख पन्नास हजार रुपये ज्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. त्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मोबाईल हॅक करून त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून ट्रांजेक्शन आयडी नुसार पाच लाख पन्नास हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केली. याबाबत सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोळी हे पुढील तपास करत आहेत.

