फक्त मुद्द्याचं!

30th April 2025
महाराष्ट्र

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

विद्यमान आमदारांना संधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजपने तीन ते चार दिवसापूर्वी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काल रात्री शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिल्या यादीची घोषणा झाली होती. यानंतर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही यादी घोषित केली आहे.

या यादीनुसार पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे बारामतीमधून विधानसभेची निवडणूक लढणार आहे. तर येवला-छगन भुजबळ, इगतपुरी- हिरामण खोसकर, सिन्नर – माणिकराव कोकाटे, अमळनेर – अनिल पाटील, दिंडोरी- नरहरी झिरवाळ, अमरावती शहर-सुलभा खोडके, परळी-धनंजय मुंडे, पिंपरी-आण्णा सोडे मुंब्रा-कळवा-नजीम मुल्ला, तुमसर-राजू कारेमोरे, नवापूर – भरत गावित, अर्जुनी मोरेगाव-राजकुमार बडोले, जुन्नर-अतुल बेनके, पुसद-इंद्रनील नाईक, मोहोळ-यशवंत माने यांना संधी मिळाली आहे.

तर वसमत-चंदकांत नवघरे, पाथरी-निर्मला विटेकर, आंबेगाव-दिलीप वळसे पाटील, इंदापूर-दत्ता भरणे, हडपसर-चेतन तुपे, देवळाली-सरोज आहिरे, माजलगाव-प्रकाश सोळके, कागल-हसन मुश्रीफ, वाई- मकरंद पाटील, कळवण-नितीन पवार,मावळ- सुनील शेळके, अहिल्यानगर शहर-संग्राम जगताप, अहेरी-धर्मरावर बाबा अत्राम,श्रीवर्धन-आदिती तटकरे, उदगीर-संजय बनसोडे, खेड आळंदी – दिलीप मोहिते पाटील, अहमदपूर-बाबासाहेब पाटील, शहापूर- दौलत दरोडा, कोपरगाव-आशुतोष काळे, अकोले-किरण लहामटे,चिपळूण-शेखर निकम,चंदगड-राजेश पाटील, या नावांचा समावेश आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"