डॉक्टर घैसास व त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल करा : आमदार अमित गोरखे

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टर सुश्रुत घैसास या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरने राजीनामा दिला आहे. आरोग्य समितीच्या अहवालानंतर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी डॉक्टर घैसास व त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांचे वैद्दयकिय प्रमाणपत्रावर टाच आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तनिषा भिशे यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोग्य समितीचा अहवाल समोर आला आहे .या घटनेबाबत रुग्णालयाला दोषी धरण्यात आले आहे. रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी रुग्णाच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोपनीय गोष्टी सोशल मीडियावर मांडल्या असे अहवालात म्हटले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे श्रीमती भिशे यांचा मृत्यू झाला असे डॉक्टर राधाकिशन पवारांनी आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद केले आहे. समितीच्या अहवालात असे म्हटले आहे, की सकाळी नऊ वाजून एक मिनिटांनी रुग्णाची रुग्णालयात एन्ट्री झाली,मात्र रुग्णाला पाच तास ताटकळत ठेवून त्यांच्यावर उपचार केले नाहीत.

रुग्णाला दोन एप्रिल रोजी बोलावले होते, पण 28 मार्चला त्यांना रक्तस्राव झाल्याने त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात बोलावले. तसेचऑपरेशन थिअटर मध्ये नेणे अगोदर दहा लाखाची मागणी केली, यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन लाख रुपये आता घ्या इतर पैशाची व्यवस्था आम्ही करू असे सांगितले .याबाबत मंत्रालयातून आणि अनेक विभागातून रुग्णालयाला रुग्ण दाखल करून घ्या असे फोन गेले, पण रुग्णालयाने त्याची दखल घेतली नाही. रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी तुमच्याकडे जे औषध असेल ते द्या ते द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने उपचार करा असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र रुग्णालयाने कोणतेही उपचार केले नाही या काळात रुग्णा रुग्णाची मानसिकता खचून गेली त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णाला ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला असे समितीच्या अहवालात म्हटले आहे.
मंगेशकर कुटुंबियांनी ज्या उद्दात हेतूने रुग्णालय सरु केले आहे,तो हेतू त्यांनी अनेक वेळा सिध्द केला आहे ,असे गोरखे यांनी सांगितले. अनेक गरीबांना यापूर्वी न्याय मिळाला आहे, मात्र डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीममुळे रुग्णालयाला डाग लागला आहे. धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यूच्या यमुना जाधव यांचा अहवाल लवकरच येईल, त्यानंतर तिन्ही अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले जातील असे गोरखे यांनी सांगितले.