दापोडीत तरुणावर प्राणघातक हल्ला

पिंपरी : “मी दापोडीतील डॉन आहे.. थांब तुझा गेम खल्लासच करतो..” असं म्हणत आरोपीने धारदार हत्याराने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. श्रेयस जवळेकर रा. दापोडी याने तरुणावर प्राणघातक हल्ला केला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दापोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा संतोष शिंगोटे (वय – १७, रा. जाधव चाळ, नरवीर तानाजी मंडळ जवळ दापोडी) याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कृष्णा शिंगोटे हा (दि.०८) रोजी सायंकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास दापोडी येथील वेलकम सलून येथे त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता.
यावेळी जुन्या पैशाच्या वादातून आरोपी श्रेयस जवळेकर याने शिंगोटे याच्यावर प्राणघातक हल्ला केला. “मी दापोडीतील डॉन आहे आणि तू माझ्याशी पंगा घेणार? थांब तुझा गेमच खल्लास करतो.” असं म्हणत धारदार हत्याराने आरोपी श्रेयस जवळेकर याने कृष्णा शिंगोटे याच्या पाठीत व गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आरोपी श्रेयस जवळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.