वनराज यांच्या बहिणींचा घरगुती वाद : बंडू आंदेकर

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची रविवारी पुण्यातील नाना पेठेत रात्री नऊच्या सुमारास वनराज यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. वनराज यांच्या दोन बहिणी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आल्याचं वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
या प्रकरणात वनराजच्या सख्या दोन बहिणी आणि मेहुण्यांचा समावेश आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे, अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. कौटुंबीक वाद आणि पैशातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वनराज यांच्या दोन बहिणी आणि दोन मेव्हण्याच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आल्याचं त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात दहा आरोपी निष्पन्न झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.
वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे. वनराज यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता.आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकर यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.