फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
गुन्हेगारी

घरावर कारवाई करण्याची भीती दाखवत घेतली ५० हजारांची खंडणी!

घरावर कारवाई करण्याची भीती दाखवत घेतली ५० हजारांची खंडणी!

तोतया पत्रकारांसह चार जणांवर गुन्हा
पिंपरी : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि तोतया पत्रकाराने देहूरोड येथील एका व्यक्तीला त्याच्या घरावर कारवाई करण्याची भीती दाखवली. त्यासाठी व्यक्तीकडून ५० हजार रुपयांची खंडणी घेतली. ही घटना शनिवारी (दि. ६) रोजी देहूरोड – मेन बाजार येथे घडली.

राजू मारीमुत्तू, चंद्रशेखर पात्रे, रामदास ताठे, बाबू टेकल (सर्व रा.देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मिंकू सत्येंद्रपालसिंग मल्होत्रा (वय ३४, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या जुन्या वडिलोपार्जित घराच्या जागी बांधकाम करत आहेत. त्या बांधकामावर कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून अतिक्रमण कारवाई करण्यासाठी तक्रार देऊ, अशी आरोपी राजू मारीमुत्तू याने फिर्यादी यांना धमकी दिली.

viarasmall
viarasmall

त्यानंतर तोतया पत्रकार चंद्रशेखर पात्रे, रामदास ताटे आणि बाबू टेकेल यांना फिर्यादी यांच्या बांधकामाजवळ पाठवून व्हिडिओ शूटिंग काढले. त्यानंतर कारवाई बाबत तक्रार न करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून ५० हजार रुपयांची खंडणी घेतली. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"