फक्त मुद्द्याचं!

7th September 2025
विधानसभा २०२४

महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महायुतीला हद्दपार करा : राहुल कलाटे

महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महायुतीला हद्दपार करा : राहुल कलाटे

राहुल कलाटेंसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एल्गार
पिंपरी : यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता वाचविण्याची लढाई आहे. निवडणुकीचा निकाल महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दिशा देणारा असेल. सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणाऱ्या महायुती सरकारला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक व महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा एल्गार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांनी केला.
शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा संघटक संज्योग वाघेरे, पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमूख केशरीनाथ पाटील, जिल्हा प्रमुख माजी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, युवासेना प्रमुख चेतन पवार, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, शहर संघटिका अनिता तुतारे, वैशाली मराठे, तुषार नवले, अनंता कोऱ्हाळे, अमोल निकम, संतोष पवार, संतोष सौंदणकर, वैशाली कुलथे, कुदरत खान, युवराज दाखले, संदीप भालके यांच्यासह विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
वाघेरे म्हणाले, सामान्य व्यक्ती, राज्य ते संबंध देश स्तरावर प्रचंड आदर, आपुलकी असणारे महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. केशरी पाटील म्हणाले, उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्व शिवसैनिक आता जीवाचे रान करतील. चेतन पवार म्हणाले, इडा पिडा जाऊदे बळीचे राज्य येऊ दे या म्हणीप्रमाणे या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणू.

महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्राणपणाने काम करतो आहे. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते प्रत्येक शिवसैनिकांच्या त्यागाची सन्मानजनक परतफेड करतील याचा मला विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने सत्तेत येणार आहे. त्यानंतर एकदीलाने काम करून महापालिकाही आपण काबीज करू

  • राहुल कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा २० तारखेला शहरातील शिवसैनिक व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानातून करेकट कार्यक्रम करू बदला घेतील

  • ऍड. सचिन भोसले
    -शहरप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"