फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

ईद-ए-मिलादची सु्ट्टी पुण्यात सोमवारी

ईद-ए-मिलादची सु्ट्टी पुण्यात सोमवारी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : राज्य शासनाने ईद-ए-मिलादची सुट्टी १८ तारखेला जाहीर केली असली तरीही पुण्यात ही सुट्टी सोमवारीच असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

अनंत चतुर्दशी १७ तारखेला मंगळवारी आहे. त्यामुळे राज्य शासनाने १८ तारखेला ईद ची सुट्टी जाहीर केली. राजपुत्रानुसार, शासनाने अधिसूचित केलेल्या सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवारी १६ सप्टेंबर रोजी दाखविण्यात आली होती. हीच सुट्टी कायम करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केला आहे. अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यासाठी ठिकठिकाणी मिरवणुका निघतात आणि गर्दी होत असता. ईद-ए-मिलादच्या दिवशी सुद्धा जुलूस काढला जातो. त्यामुळेही रस्त्यांवर गर्दी असते. दोन्ही सण लागोपाठ असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी सरकारकडून खबरदारी घेण्यात आली आहे. दोन्ही समाजात शांतता कायम रहावी आणि दोघांनाही सण आपापल्या पद्धतीने साजरा करता यावा, यासाठी सुटीमध्ये बदल सरकारने केला आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"