फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पुणे

‘एक्स शांझा शक्ती’ सरावातून आपत्कालीन प्रतिसादाची तयारी सिद्ध!

‘एक्स शांझा शक्ती’ सरावातून आपत्कालीन प्रतिसादाची तयारी सिद्ध!

पुणे : पुण्यातील बी. जी. रेंज आणि सेंट्रल दिघी रेंज येथे बुधवारी (दि. ८) ‘एक्स शांझा शक्ती’ या संयुक्त सरावाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आर्मी ऑर्डनन्स कोर (AOC) हेड क्वार्टर दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा 29 FAD व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अग्निशमन दल, तसेच पुणे मनपा अग्निशमन दल यांच्या संयुक्त विद्यमाने सराव पार पडला.

सरावादरम्यान दहशतवादी हल्ला, स्फोट, आग, इमारत कोसळणे आणि नागरिक अडकणे अशा संभाव्य आपत्तींची प्रत्यक्ष दृश्ये उभी करून बचावकार्य, तात्काळ प्रतिसाद, आधुनिक उपकरणांचा वापर आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यांचे प्रात्यक्षिक दाखवले गेले. पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफाडे यांनी सांगितले की, ‘या सरावामुळे अग्निशमन विभाग अधिक जलद, प्रभावी आणि समन्वयपूर्ण कामकाज करण्यास सज्ज झाला असून, भविष्यातील कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढला आहे’.

या सरावातून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलासह आर्मी ऑर्डनन्स कोर (AOC) हेड क्वार्टर दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा 29 FAD, पुणे मनपा अग्निशमन दल हे सर्व सदैव तत्पर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"