फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
महाराष्ट्र

राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर!

राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर!

जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.  राज्यात जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निवडणुकांची घोषणा पत्रकार परिषदेत केली . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेण्याबाबत आदेश दिलेले आहेत.

viara vcc
viara vcc

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते देणे बंधनकारक आहे .त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समिती गणांसाठी द्यावे लागेल. निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे असे आयुक्तांनी सांगितले.

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे
नोटिफिकेशन : 16 जानेवारी रोजी, उमेदवारी अर्ज : 16 जानेवारी ते 21 जानेवारी, जागांचा तपशील : 22 जानेवारी ,अर्ज माघारी : 27 जानेवारी, (दुपारी तीन वाजेपर्यंत) ,अंतिम यादी व चिन्ह वाटप : 27 जानेवारी दुपारी साडेतीन नंतर, मतदान : 5 फेब्रुवारी रोजी, मतमोजणी : 7 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता.

कोणत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका
कोकण विभाग:– रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभाग:- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा विभाग:- छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर

निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा देण्यात आली आहे. त्यानुसार 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी नऊ लाख आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी सहा लाख रुपये खर्च मर्यादा असेल ,तर 61 ते 70 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी सात लाख 50 हजार आणि त्यानंतरच्या पंचायत समित्यांसाठी पाच लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असेल, तसेच 50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी सहा लाख आणि पंचायत समित्यांसाठी चार लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे.

जिल्हा परिषदांसाठींचा जागांचा तपशील
एकूण जागा: 731 ,महिलांसाठी जागा : 369, अनुसूचित जातींसाठी जागा : 83, अनुसूचित जमातीसाठी जागा: 25, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा : 191
पंचायत समितीच्या जागांचा तपशील
एकूण जागा :1462 ,महिलांसाठी जागा 731 ,अनुसूचित जातींसाठी जागा 166, अनुसूचित जमातींसाठी जागा 38, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा 342

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"