फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
महाराष्ट्र

नवले ब्रिजवरील अपघातात आठ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी!

नवले ब्रिजवरील अपघातात आठ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी!

ट्रक आणि कंटेनर मध्ये कार अडकल्याची माहिती
पुणे : पुणे शहरातील नवले ब्रिजवर सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे मुंबई पुणे महामार्ग नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे .आज गुरुवारी येथे तीन ते चार गाड्यांची धडक बसून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे .तर अनेक जण जखमी झाले आहेत.नवले पुलावर अपघात झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची घटना घडली.

शहरातील नवले ब्रिज वर सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात .तीन ते चार गाड्यांची धडक बसल्याने अपघात झाला असून दोन कंटेनरच्या मध्ये एक कार जळत असल्याचे दिसून आले .या कारमधून एक कुटुंब प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या घटनेनंतर अग्निशामक दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. काही काळासाठी नवले पुलासह रस्त्यावरची वाहतूक थांबवण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या मदत व बचाव कार्य सुरू आहे .नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला .त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत .पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशामक दलाने घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

viara vcc
viara vcc

राजस्थान पासींगची लोडेड ट्रक मुंबईच्या दिशेने चालला होता. मात्र नवले ब्रिजवरील सेल्फी पॉईंट वर ब्रेक फेल झाल्याने या ट्रकने इतरही वाहनांना धडक दिली .तसेच ट्रकने पुढे जाऊन कंटेनरला धडक दिली त्या कंटेनरच्या अलीकडे असलेली कार ,ट्रक आणि कंटेनर मध्ये अडकल्याची माहिती घटनास्थळावरून पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या धडकेत कारने पेट घेतल्यानंतर ट्रकलाही आग लागली. ब्रेक फेल झालेल्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाल्याचे समजते .आज पर्यंत नवले पुलावर कायम अपघात घडत असतात ,परंतु सीसीटीव्ही फुटेज लावण्या खेरीज पोलिसांनी या ठिकाणी कोणतीही कारवाई केली नाही. सातार्याकडून येणाऱ्या गाड्या नवले ब्रिज पर्यंत उतार असल्याने बंद करून येतात. त्यामुळे त्या कंट्रोल होत नाहीत असे सांगण्यात येते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"