फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
देश विदेश

दिल्ली एनसीआर आणि हरियाणात भूकंप!

दिल्ली एनसीआर आणि हरियाणात भूकंप!

नवी दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या काही भागांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. दिल्ली एनसीआरला ४.४ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Vaiga Digital Creatives
Vaiga Digital Creatives

भूकंपामुळे जमिनीखाली १० किमी. आतपर्यंत जमीन हादरल्याची नोंद भूकंपमापन केंद्राने केली आहे. संपूर्ण दिल्ली एनसीआर तसेच हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद भूकंपमापन केंद्राने केली. अनेक ठिकाणी दहा सेकंद जमीन हादरत होती. भूकंप झाल्यावर काही ठिकाणी नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधून बाहेर मोकळ्या जागेत आले होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"