ड्रंक अँड ड्राईव्ह;पंधरा दिवस साधी कैद!

पिंपरी: ड्रंक अँड ड्राईव्ह करून दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीस न्याय दंडाधिकारी वर्ग एक मोटर वाहन न्यायालय शिवाजीनगर यांनी पंधरा दिवस साधी कैद आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत 25 जून 2025 रोजी रात्री नऊ वाजता योगेश देविदास माळी (वय 28, रा. विठ्ठल मंदिराजवळ, हिंजवडी गावठाण) हा पूर्ण मध्यांकाचे अमलात असताना त्याने त्याचे ताब्यातील यामाहा मोटरसायकल क्रमांक एम. एच. 12/ एस सी/ 91 52 ही दुचाकी घेऊन हिंजवडी येथून जात असताना पोलीस हवलदार दौंडकर यांना मिळून आला. आरोपी माळी याचे वर हिंजवडी वाहतूक विभाग येथे मोटर वाहन कायदा कलम 185 प्रमाणे कारवाई करण्यात आली. मोटर वाहन मोटर वाहन न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे खटला चालवण्यात आला.
सोमवार दोन मार्च रोजी मोटर वाहन न्यायालया चे न्याय दंडाधिकारी वर्ग एक श्री पाटील यांनी आरोपीस दोषी ठरवून त्यास पंधरा दिवस साधी कैद व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा आणि द्रव्य दंड न भरल्यास दहा दिवस साधा कारावास आणि मोटार वाहन कायदा कलम 130 एक ऑब्लिक 177 प्रमाणे 500 रुपये दंडद्रव दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक दिवस साधा करावास अशी शिक्षा सुनावली .पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी या कारवाई संदर्भात जाहीर आवाहन केले आहे की, नागरिकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये .मद्य प्राशन करून दुचाकी चालवणाऱ्यास पंधरा दिवस साधी कैद

