फक्त मुद्द्याचं!

17th March 2026
गुन्हेगारी

जांबे गावातील गोडाऊनमध्ये सहा लाख 63 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

जांबे गावातील गोडाऊनमध्ये सहा लाख 63 हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

पिंपरी : जांबे गावातील एका गोडाऊनमध्ये सहा लाख 63 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ मिश्रित पावडर, काळ्या रंगाचा अमली पदार्थ विक्रीकरिता आढळून आला. पोलिसांनी कारवाई करून सर्व माल जप्त केला. ही कारवाई रविवार 15 मार्च रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास जांबे ग्रामपंचायत पाठीमागे चैतन्य फुड्स ,ता. मुळशी येथे करण्यात आली..

viara vcc
viara vcc

याबाबत मितेश मोहन यादव पोलीस शिपाई ,अमली पदार्थ विरोधी पथक ,गुन्हे शाखा यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कैलास दत्तात्रय मांढरे (वय54, म्हाळसाकांत चौक ,आकुर्डी), अनुराधा कैलास मांढरे (वय 54, म्हाळसाकांत चौक आकुर्डी) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपींनी रितेश गुप्ता (रा. कनोज, उत्तर प्रदेश पूर्ण पत्ता नाव माहित नाही )यांच्याकडून हा अमली पदार्थ आणला असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांचे चैतन्य फुड्स गोडाऊन असून या गोडाऊन मध्ये अमली पदार्थ मिश्रीत पावडर काळ्या रंगाचा अमली पदार्थ मिश्रित पातळ पदार्थ, तीन मोबाईल, एक चार चाकी गाडी, वेगवेगळ्या मशीन पोलिसांनी कारवाईत जप्त केल्या आहेत. तसेच पांढऱ्या रंगाचे झाकण असलेल्या प्लॅस्टिकच्या डबीमध्ये काळ्या रंगाचे उग्र वास असलेली अमली पदार्थ मिश्रीत खायचे पानांमध्ये टाकून खायला वापरण्यासाठी बनवलेला पातळ पदार्थ कुठून आणला असे आरोपींना विचारता त्यांनी रितेश गुप्ता राहणार कनोज उत्तर प्रदेश येथील आरोपी क्रमांक तीन यांच्याकडून आणल्याचे सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळू हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"