पाकिस्तान मधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर!

चंदीगड : भारत पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत हेरॉईन आणि दोन ड्रोन जप्त केले . ही कारवाई पंजाबच्या अमृतसर आणि तरंगतारण या सीमा वरती जिल्ह्यामध्ये करण्यात आली.

बीएसएफच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार विशिष्ट गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली . लष्कराने तरणतारण जिल्ह्यातील नौसेरा धल्ला गावाजवळ शोध मोहीम राबवली. एका शेतातून एक डीजेआय मॅविक, तीन क्लासिक ड्रोन जप्त करण्यात आला . हा ड्रोन पाकिस्तान मधून पाठवण्यात आला होता. आणि त्याचा वापर तस्करीसाठी केला जाण्याची शक्यता होती .
दुसऱ्या एका घटनेत अमृतसर सीमेवर गस्त घालणाऱ्या सतर्क सैन्याला धनी कलान गावाजवळील सीमेवरील कुंपणाच्या पलीकडे असलेल्या शेतात संशयास्पद हालचाली दिसल्या. शोध घेतल्यानंतर एक डीजेआय मॅविक, तीन क्लासिक ड्रोन आणि हेरॉईन पॅकेट जप्त करण्यात आले. या पाकीटचे वजन 558 ग्रॅम आहे .पाकिस्तान मधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर वाढत आहे .ड्रोन तस्करीला रोखण्यात बीएसएफने अलीकडच्या काही महिन्यात यश मिळवले आहे. पाकिस्तानी तस्कर सतत नवीन पद्धती वापरून ही तस्करी करत आहेत .

