HSRP नंबरप्लेटसाठी वाहनधारकांकडून दुप्पट-तिप्पटी वसूल!

पुणे : सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात त्यासाठी तीन खासगी कंपन्यांना सहाशे कोटींचे कंत्राट देण्यात आल आहे. मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील या तीन कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलं आहे. ही कोट्यवधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेच सुरु आहे . या तीन खाजगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने आणि कधी कंत्राट देण्यात आले याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या सगळ्याबाबत संशय व्यक्त केला.
कोणत्या तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं आहे?
- रॉरमेत्रा सेफ्टी सिस्टम लि.
- रीअर मेझॉन इंडिया लि.
- एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि.
महाराष्ट्र आणि इतर राज्यात नक्की किती पैसे आकारले जाणार आहेत?
दुचाकी नंबरप्लेससाठी किती रक्कम?
- महाराष्ट्र – 450
- गुजरात – 160
- गोवा – 155
- आंध्रप्रदेश – 245
- झारखंड – 300
चारचाकी नंबरप्लेससाठी किती रक्कम? - महाराष्ट्र – 745
- गुजरात – 460
- गोवा – 203
- झारखंड – 540
- आंध्र प्रदेश – 619
अवजड वाहनांच्या नंबरप्लेससाठी किती रक्कम? - महाराष्ट्र – 475
- गुजरात – 480
- गुजरात -232
- झारखंड – 570
- आंध्र प्रदेश -649
HSRP नंबर प्लेट कुठे मिळेल?
transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.
यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल ,तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा.
आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल.
अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवण्याचं आवाहन
शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. इतर ठिकाणाहून एचएसआरपी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. वाहन प्रणालीत आपली एचएसआरटी पेंडींगवर दिसेल. त्यामुळे अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवावं लागणार आहे.