फक्त मुद्द्याचं!

27th June 2025
गुन्हेगारी

तळवडे आयटी परिसरात दुहेरी खून; एक संशयित ताब्यात!

तळवडे आयटी परिसरात दुहेरी खून; एक संशयित ताब्यात!

पिंपरी : तळवडे आयटी पार्क परिसरात बुधवार 25 जून रोजी सकाळी धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे .डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला . हे प्रकरण खुनाचे असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

viarasmall
viarasmall

मंगला सुरज टेंभरे ( 30 अमरावती) आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (55 अकोला ) अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते दोघेही तळवडे परिसरात वास्तव्यास होते .बुधवारी त्यांचे मृतदेह निदर्शनास आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले . या दोन्ही हत्याकांडाचा तपास पोलिसांनी तात्काळ सुरू केला आहे . तपासादरम्यान ठेकेदार दत्तात्रेय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे, मात्र या हत्तेमागील नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे .या घटनेमुळे तळवडे आणि आयटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे देहूरोड पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"