`सरहद`मध्ये रंगली सुश्राव्य दिवाळी पहाट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : ९८ व्या अखिल भारतीय अभिजात मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून सरहद स्कूल कात्रज येथे दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वसुबारसेनिमित्त हा कार्यक्रमा दुग्ध शर्करा योग ही जुळून आला.सुमधुर अशा मराठी भक्ती गीत, भावगीत, लावणी, गोंधळ ,भारुड या गीतांनी सरहद चा परिसर मंत्रमुग्ध झाला. सरहद स्कूल आणि जुनियर कॉलेज मधील विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. अप्रतिम अशा सुमधुर गीतांनी सरहद शाळेचे वातावरण मंगलमय झाले होते. उपस्थितानी या मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला.
स्वरगंधारचे संस्थापक कवी गोपाळ कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रत्येक गाण्याला त्यांनी मनमुराद दाद देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साह वाढवला.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सचिव सौ .सुषमा नहार मॅम विश्वस्त श्री.शैलेश वाडेकर सर, अनुज नहार सर, मुख्याध्यापिका सौ.कविता वानखेडे मॅम आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन संगीत शिक्षिका अर्पिता कथाळे आणि इरा देशपांडे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गीताने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता जाधव आणि पल्लवी शिर्के यांनी केले.