फक्त मुद्द्याचं!

22nd April 2025
पुणे

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन!

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन!

दूधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन
पुणे : जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अपर पोलीस अधिक्षक, पुणे, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,पुणे, उप नियत्रंक वैध मापन शास्त्र पुण हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
दूधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, डेअरी याची माहिती समितीकडे देण्यात यावी असे आवाहन समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्वपूर्ण पोषक तत्वांचा स्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. तथापि हाणीकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण होतो. दुध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टीक मुल्याशी तडजोड करीत नाहीत. तर मानवी शारिरीक समस्या, पचन, अॅर्लजी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान या सारख्या गंभीर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. या समस्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

viara ad
viara ad

जिल्ह्यातील दूध संकलन स्विकृती केंद्र, पुणे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने तसेच सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणीसाठी सहायक आयुक्त (अन), अन्न औषध प्रशासन विभाग, पुणे विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्दीष्ठ ठरवून देण्यांत आले आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणा-या व्यक्ती, डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून भेसळ केल्याचेआढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक व EMAIL ID.:- FDAPUNE2019@GMAIL.COM वर तक्रार नोंदवावी. दूध भेसळीबाबत तक्रार, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येईल असेही समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"