फक्त मुद्द्याचं!

12th March 2026
गुन्हेगारी

प्रॉपर्टीच्या मालकीवरून वाद ; डोक्यामध्ये हातोडा मारून केले गंभीर जखमी!

प्रॉपर्टीच्या मालकीवरून वाद ; डोक्यामध्ये हातोडा मारून केले गंभीर जखमी!

तीन आरोपी अटक
पिंपरी : प्रॉपर्टीच्या मालकीवरून वाद झाल्याने दोघाजणांनी एका व्यक्तीला शिवीगाळ ,दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, आणि डोक्यामध्ये हातोडा मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार ११ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान सर्वे नंबर 9 ब, तीन या जागेवरील कामधेनू बिल्डिंग, ढोरेनगर, सांगवी येथे घडली.

याबाबत हरीश शाम ढोरे (वय 43, पंचदीप अपार्टमेंट, फ्लॅट नंबर दोन, जुनी पोस्ट ऑफिस लाईन, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नारायण आत्माराम ढोरे, अभिजीत नारायण ढोरे व महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे जखमी वडील श्याम ढोरे हे त्यांच्या तळमजल्यावरील फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले असता तेथे आरोपी क्रमांक एक दोन व तीन यांनी प्रॉपर्टीच्या मालकीवरून फिर्यादी व त्यांच्या वडिलांशी भांडण काढून शिवीगाळ ,दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक एक व दोन यांनी फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यामध्ये जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातोडा मारून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादी यांना देखील नाथा बुक्क्यांनी हातोड्याने मारहाण केली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खलाटे हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

ऑनलाइन 27 लाख 72 हजार रुपयांना गंडा!
पिंपरी : एका महिलेचा विश्वास संपादन करून 27 लाख 72 हजार 47 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ही घटना 25 एप्रिल 2024 ते 19 नोव्हेंबर 2025 या काळात रा. फ्लॅट नंबर 22 /23, शुभम पार्क, बी पब्लिक दोन, सेंट मेरी स्कूल जवळ, सेक्टर 26, निगडी, प्राधिकरण येथे घडली.

या प्रकरणी एका व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अलेक्स विल्यम नावाच्या व्यक्तीने युके मधील मोबाईल नंबर वरून फिर्यादीच्या पत्नीशी संवाद साधला. तिचा विश्‍वास संपादन करुन तिच्या बँकेच्या आयडीएफसी फर्स्ट बँक, कॉसमॉस बँक ,एसबीआय बँक व भगिनी निवेदिता बँक मधील खात्यावरुन 27 लाख 72 हजार 47 रुपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेतले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"