फक्त मुद्द्याचं!

10th April 2026
पुणे

‘डिजिटल जनसंवाद ही काळाची गरज’: आयुक्त डॉ. अभिजित चौधरी

‘डिजिटल जनसंवाद ही काळाची गरज’: आयुक्त डॉ. अभिजित चौधरी

‘व्हॉईस ऑफ पीएमआरडीए’ ई-न्यूजलेटरचे शानदार प्रकाशन
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ पीएमआरडीए’ या डिजिटल ई-न्यूजलेटरचा गुरुवारी (दि. २ एप्रिल) शानदार शुभारंभ करण्यात आला. “बदलत्या तांत्रिक युगात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जनतेशी जोडले जाणे, ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी केले.

viara vcc
viara vcc

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, उपायुक्त हिंमत खराडे, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफाडे, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पीएमआरडीएचे धोरणात्मक निर्णय, राबविण्यात येणारे विविध प्रकल्प आणि विकासकामांची अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचावी यासाठी हे ई-न्यूजलेटर महत्त्वाचे माध्यम ठरेल. या उपक्रमामुळे पीएमआरडीएच्या कामात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांनी या उपक्रमाची भूमिका विशद केली. पीएमआरडीएच्या योजना आणि जनहितार्थ निर्णय थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ कार्यान्वित करण्यात आल्याचे नमूद केले. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"