रिंगरोडला जोडणाऱ्या तीन रस्त्यांचा विकास!

कासारसाई -चांदखेड, मुठा टॉप- उरवडे आणि निघोजे ते मोई रस्त्यांचा विकास
पिंपरी : पीएमआरडीए हद्दीतील रिंगरोडला जोडणाऱ्या १५ ठिकाणच्या रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये कासारसाई -चांदखेड, मुठा टॉप- उरवडे आणि निघोजे ते मोई असे नव्याने तीन ठिकाणी रस्ते तयार करण्यात येणार आहेत.
पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहराचे वाढते नागरिकरण यामुळे वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातून आणि बाहेरून पुणे- सातारा कोल्हापूर, पुणे सोलापूर, पुणे- औरंगाबाद, पुणे नाशिक आणि पुणे- मुंबई जुना महामार्ग, मुंबई- पुणे-बंगळूरु असे प्रमुख मार्ग जातात. दोन शहरांचे नागरिकीकरण वाढल्याने येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे, त्यावर पर्याय म्हणून पीएमआरडीए हद्दीतून आणि दोन्ही शहराच्या बाहेरून रिंगरोड प्रस्तावित केला आहे. त्यास जोडण्यासाठी १४७.५० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील रिंगरोड मावळ, खेड, शिरूर, हवेली, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी या नऊ तालुक्यातून जातो. या रिंग रोडसाठी जोड रस्ते तयार करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. रिंगरोडपासून जवळच असणाऱ्या १५ ठिकाणी इन आणि आउट केले आहेत. त्यापैकी १२ इंटचेंजच्या ठिकाणी सध्या कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. त्यापैकी तीन ठिकाणी नव्याने कनेक्टिव्हिटी तयार करण्यात येणार आहे. सुमारे १२. १० किलोमीटरचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत.हद्दीमध्ये रिंगरोडचे काम प्रस्तावित आहे. त्याला जोडणाऱ्या विविध १५ ठिकाणच्या इंटरचेंज ठिकाणांचा विकास करण्यात येणार आहे. सुधारणा करण्यात येणार आहे. त्यातून वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.
नव्याने तीन ठिकाणी रस्ते विकसित होणार
- राष्ट्रीय महामार्ग ११५ मुठा नदी टॉप ते उरवडे या ३.५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १९. २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
- राष्ट्रीय महामार्ग १३० चांदखेड ते कासारसाई येथील पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी २७. ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
- निघोजे ते मोईला जोडणाऱ्या ३. ६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
- रिंगरोडलगतच्या इन आउटसाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहे. त्यासाठी २४कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या बाजूने असणाऱ्या पीएमआरडी हद्दीमध्ये रिंगरोडचे काम प्रस्तावित आहे. त्याला जोडणाऱ्या विविध १५ ठिकाणच्या इंटरचेंज ठिकाणांचा विकास करण्यात येणार आहे. सुधारणा करण्यात येणार आहे. त्यातून वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.