फक्त मुद्द्याचं!

21st March 2026
गुन्हेगारी

चार गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई !

चार गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई !

पिंपरी: पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चार जणांवर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे

viara vcc
viara vcc

पोलिसांनी पिंपरी चिंचवड हद्दीतील अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीतील हर्ष उर्फ लड्ड्या अमर बहोत (रा. भीमनगर) याच्यावर सहा गुन्हे आहेत. त्याच्यावर स्थानबद्धतीची कारवाई करण्यात आली आहे, त्याचबरोबर महाळुंगे एमआयडीसी परिसरातील प्रल्हाद शांताराम बच्चे (रा. खेड) याच्यावर सहा गंभीर गुन्हे आहेत.
महाळुंगे एमआयडीसी आणि भोसरी एमआयडीसी चाकण, चिखली, भोसरी या परिसरात परिसरातील अट्टल गुन्हेगार रामदास मच्छिंद्र हानपुडे ( रा. सुभाषवाडी निघोजे) यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. तर हिंजवडी पोलीस हद्दीतील स्वप्निल बाळासाहेब पवार (रा. मोहिते वस्ती, माण) याच्यावर आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस ठाण्यांनी या चारही जणांचे प्रस्ताव आयुक्त विनय कुमार चोबे यांच्याकडे पाठविले होते. त्यानंतर आयुक्तांनी एक वर्ष कालावधीसाठी स्थानबद्धतेचे आदेश जारी केले आहेत. या चौघांना नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध केले आहे.

मागील वर्षी सन २०२४ मध्ये गुन्हे करणाऱ्यांवर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेच्या एकूण ३२ कारवाया करण्यात आल्या. २०२५ मध्ये आजपर्यंत एकूण २२ कारवाया केल्या आहेत. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारीत घट झाली आहे.-डॉ शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"