लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
ठाणे, प्रतिनिधी : महिलांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय या पुढेही सुरू राहील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या भाजपाच्या विजयाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिले जाते. सोमवारी ठाणे येथे एका सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या योजनेअंतर्गत आम्ही दरमहा दीड हजार रुपये महिलांना सहाय्य म्हणून देत आहोत. जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला पुन्हा एकदा मिळाली आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित समस्या लवकरच सोडविल्या जातील. २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले काही विकास प्रकल्प आता वेळेत पूर्ण केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्य सरकारने सुरू केलेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेचे त्यांनी कौतुक केले. क्लस्टर योजनेमुळए सर्व प्रकारच्या पुनर्वसन आणि विकासकामासाठी सर्वसमावेशक उपाय उपलब्ध होऊ शकतात. प्रत्येत बाधित कुटुंबाला त्यांच्या पात्रतेचे फायदे मिळतील, याचीही सरकारकडून खात्री करून घेतली जाईल, असे शिंदे म्हणाले.